रोकड लांबविल्याप्रकरणी दोन वेटरला अटक

वाकी- हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या अहमदनगरच्या 30 वर्षीय तरुणाच्या विसरलेल्या पिशवीतून हॉटेलमधील तीन वेटरांनी तब्बल 57 हजार 500 रुपये परस्पर लांबविले. ही घटना चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील शेलपिंपळगाव (ता. खेड) गावच्या हद्दीतील हॉटेल रसिकामध्ये शुक्रवारी (दि. 3) रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी याच हॉटेलमधील तीन वेटरपैकी दोन वेटरला आज (शनिवारी) अटक केली असून दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना मंगळवार (दि. 7) पर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.
संतोष अर्जुन जगताप (वय 30), धनंजय नामदेव शिंदे (वय 28, दोघेही रा. शेलपिंपळगाव, ता. खेड अशी अटक करण्यात आलेल्या दोन वेटरची नावे आहेत. तर त्यांचा एक साथीदार मनोजकुमार शामसिंग ठाकूर (रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) याच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊसाहेब कोंडीभाऊ गुंजाळ (वय 30, रा. दहीटणे, गुंजाळ, ता. पारनेर, जि. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेलपिंपळगाव हद्दीतील रसिका हॉटेलमध्ये गुंजाळ व त्यांचे मित्र शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या जवळील दोन लाख रुपयांची पिशवी जवळच्याच एका टेबलवर ठेवली होती. जेवण करून जेवणाचे बिल देवून ते हॉटेल बाहेर आल्यानंतर गाडीने प्रवासाला निघाले. मात्र, पुढे काही अंतरावर गेल्यानंतर आपली पैशाची पिशवी हॉटेलमध्येच विसरली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे ते पुन्हा सबंधित हॉटेलमध्ये आले. त्यावेळी त्या पिशवीची चेन अर्धवट उघडलेली दिसून आली. त्यामुळे गुंजाळ यांनी पिशवी उघडून खात्री केली असता 2 लाख रुपयांपैकी त्यातील 57 हजार 500 रुपये लंपास झाल्याचे आढळून आले. त्यामुळे गुंजाळ यांनी याच हॉटेलमधील संतोष जगताप, धनंजय शिंदे व मनोजकुमार ठाकूर यांच्यावर संशय व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी संतोष जगताप व धनंजय शिंदे यांच्या मुसक्‍या आवळून त्यांच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून रात्री उशिरा अटक केली. चाकण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल ढेकणे व त्यांचे अन्य सहकारी पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)