रोकड टंचाईच्या विरोधात बीजेडीची निदर्शने

भुवनेश्‍वर – ओडिशात निर्माण झालेली रोकड टंचाई अद्याप कायम असल्याने सत्तारूढ बिजू जनता दलाने त्याच्या विरोधात आज राज्यभर निदर्शने केली. ओडिशातील अनेक एटीएम मशिन्स बंद आहेत त्या ठिकाणी ही निदर्शने करण्यात आली. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे येथील कार्यालय तसेच विविध राष्ट्रीयकृत बॅंकांच्या शाखांच्या ठिकाणीही या निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. या राज्यव्यापी निदर्शनांना कार्यकर्ते व नागरीकांचे मोठे समर्थन लाभले.

बिजीडेच्या महिला, युवक व विद्यार्थ्यांच्या शाखांनीही यात भाग घेतला. या रोकड टंचाईच्या संबंधात त्वरीत काही उपाययोजना केली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असे या पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला कोणत्याच क्षेत्रात चांगली कामगिरी नोंदवता आलेली नाही असा आरोप बिजेडीचे सरचिटणीस संजय दासबर्मा यांनी सांगितले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)