रोकडटंचाई असताना कर्नाटकात सापडताहेत उच्च मुल्याच्या नोटा

निवडणुकीदरम्यान कारवाई: 2000, 500 रूपयांच्या नोटा जप्तीचे प्रमाण 97 टक्के
नवी दिल्ली – देशाच्या विविध भागांत रोकडटंचाई असताना विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या कर्नाटकात मात्र पैशांचा ओघ सुरू आहे. त्या राज्यात प्राप्तिकर विभागाने निवडणुकीदरम्यान कारवाई करताना आतापर्यंत 4 कोटी 13 लाख रूपयांची रोकड जप्त केली आहे. त्यामध्ये 2 हजार आणि 500 रूपयांच्या स्वरूपातील उच्च मुल्याच्या नोटांचे प्रमाण तब्बल 97 टक्के इतके आहे.

कर्नाटकात 12 मे या दिवशी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. त्या राज्यात निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याला अवघे काही दिवसच लोटले असताना मोठ्या प्रमाणात रोकड हाती लागत आहे. निवडणुकीदरम्यान काळ्या पैशांचा वापर आणि मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशांचा वापर रोखण्यासाठी विविध यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. त्यातून रोकडजप्तीची कारवाई झाली आहे. कर्नाटकात जप्त करण्यात आलेल्या 2 हजार आणि 500 रूपये मुल्याच्या नोटांची एकूण रक्कम 4 कोटी 3 लाख रूपये इतकी आहे. एकीकडे बॅंका आणि एटीएममधून पैसे काढताना सामान्य जनतेला अडचणींना सामोरे जावे लागत असताना; दुसरीकडे कर्नाटकात सापडणारी रोकड कुणाच्याही भुवया उंचावणारी आहे.

कर्नाटकात सापडणाऱ्या पैशांचे धागेदोरे राज्याबाहेरही असण्याची उदाहरणे पुढे येत आहेत. एका प्रकरणात एका व्यक्तीकडून विमानतळावर सुमारे 16 लाख रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. ती व्यक्ती पैशांच्या स्त्रोताची माहिती देऊ शकली नाही. त्याप्रकरणाशी संबंधित कारवाई करताना मुंबईतूून 37 लाख रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणात एकूण 53 लाख 50 हजार रूपयांची बेहिशेबी रक्कम हस्तगत करण्यात आली. दरम्यान, कर्नाटकात 4.52 किलो इतके सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले. त्यांची किंमत 1 कोटी 32 लाख रूपये इतकी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)