रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाला मोठा धक्का; नेथन कुल्टर संघातून बाहेर

नवी दिल्ली –  आयपीएलचा अकरावा हंगाम सुरु होण्याआधी विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाला एक मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज नेथन कुल्टर-नाईल आपल्या दुखापतीमधून अद्याप सावरलेला नाहीये, या कारणामुळे आयपीएलचा अकरावा हंगाम कुल्टर-नाईल खेळू शकणार नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. कुल्टर-नाईलच्या जागी न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कोरी अँडरसनला रॉयल चँलेजर्सच्या संघात जागा देण्यात आली आहे.

रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाचा मुख्य प्रशिक्षक डॅनिअल व्हिटोरी यांनी कुल्टर-नाईलच्या दुखापतीबद्दल संघाची भूमिका जाहीर केली. कुल्टर-नाईल अतिशय गुणवान गोलंदाज असून त्याचं संघात नसणं ही आमच्यासाठी दुर्दैवी गोष्ट असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)