‘रॉयल एनफिल्ड क्लासिक ५००’च्या नव्या एडिशनची किंमत जाहीर

नवी दिल्ली : रॉयल एनफिल्डने लॉन्च केलेल्या क्लासिक ५०० बुलेटची किंमत अखेर जाहीर करण्यात आली आहे. याचं नाव पेगासस असे ठेवण्यात आले आहे. या बाइकची फ्लाईंग फ्ली म्हणूनही ओळख आहे. भारतात या बुलेटची किंमत २.४९ लाख (ऑन रोड – महाराष्ट्र) आणि २.४० लाख (ऑन रोड – दिल्ली) ठेवण्यात आली आहे. या बुलेटचे ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे. १० जुलैपासून बुकिंग सुरु होणार आहे.

जगभरात या बाइकचे रॉयल एनफिल्ड फक्त एक हजार युनिट्स तयार करणार आहे. हे अत्यंत लिमिटेड एडिशन मॉडल असणार आहे. यामधील १९० युनिट्स एकट्या ब्रिटनमध्ये विकले जाणार आहेत. तर भारतात एकूण २५० युनिट्स विकले जाणार आहेत.

कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पेगासस मॉडेल दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. Royal Enfield Classic 500 Pegasus लिमिटेड एडिशन मॉडेलमध्ये ४९९ सीसी, एअर कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात येईल. हे इंजिन ५२५० आरपीएमवर २७.२ बीएचपी पॉवर आणि ४००० आरपीएमवर ४१.३ न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करेल. बाइकचा कर्ब वेट १९४ किलोग्राम आहे. सर्व मॉडेल्सवर ब्राऊन हॅण्डलबार ग्रिप्स, लेदर स्ट्रॅप, काळ्या रंगाचे सायलेन्सर, रिम्स, किकस्टार्ट लिव्हर आणि पेडल्स दिसतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)