रॉडच्या मारहाणीत पत्नी रक्तबंबाळ; घाबरलेल्या पतीचे स्वतःवरही वार

परभणी : पत्नीसोबत भांडण विकोपाला गेल्यामुळे रागाच्या भरात पतीने तिला रॉडने मारहाण केली. मात्र पत्नी गंभीर जखमी झाल्याचे पाहून पतीने स्वतःवरही वार केले. परभणीमध्ये हा प्रकार घडला आहे. मारहाणीत पत्नी गंभीर जखमी झाल्या असून तिला 100 पेक्षा अधिक टाके पडले आहेत.

परभणीतील विद्यानगर भागात राहणाऱ्या झरकर कुटुंबात ही घटना घडली. व्यावसायिक असलेले माऊली झरकर हे पत्नी गीता झरकर आणि आपल्या मुलासोबत राहतात. पती-पत्नीमधे काही कारणावरुन भांडण झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की माऊली यांनी रागाच्या भरात गीता यांना रॉडनी मारहाण केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला पाहून पती माऊली झरकर यांनी भीतीपोटी स्वतःच्या अंगावरही वार केले. यामध्ये माऊलीही गंभीर जखमी झाले आहेत. झरकर दाम्पत्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या मारहाणीत गीता यांना शंभरपेक्षा जास्त टाके पडले आहेत. भांडणाचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)