रॉजर फेडरर चांगला टेनिसपटू सोबत चांगला माणूस – विराट कोहली 

माऊंट मोंगानुई: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी नुकतीच प्रसिद्ध टेनिसपटू रॉजर फेडरर याची भेट घेतली. तसेच टेनिसमध्ये पुरुषांच्या जागतिक क्रमवारीत पाहिल्यास्थानी असलेल्या नोव्हाक जोकोविच आणि महिलांच्या क्रमवारीत माजी अव्वल खेळाडू सेरेना विलियम्स यांचे सामने पाहिले.

रॉजर फेडररला भेटून कसे वाटले असे विराटला विचारले असता विराट म्हणाला, रॉजर फेडरर एक चांगला टेनिसपटू तर आहेच सोबत तो एक चांगला माणूस देखील आहे. तसेच तो माझा आवडता टेनिसपटू असून त्याला भेटून मला खूप आनंद झाला. माझ्यासाठी तो खूप सुंदर क्षण होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडचा तिसरा एकदिवसीय सामन्यात 7 विकेटसने पराभव करत विजय संपादित केला आहे. या विजयाबरोबरच भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. मोहम्मद शमीने 9 षटकांत 41 धावा देत तीन गडी बाद केले. त्याला या कामगिरीबदल सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)