रॉजर फेडररला पराभवाचा धक्‍का 

मियामी ओपन टेनिस स्पर्धा 
मियामी – विश्‍वक्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला अग्रमानांकित खेळाडू रॉजर फेडरर हा बिगरमानांकित थानासी कोक्कीनाकीस कडून पराभुत झाला. पुरुष विभागातील इतर महत्वाच्या सामण्यात ऍड्रीयन मन्नारीनो या 18वे मानांकन असणाऱ्या खेळाडूला स्टीव जॉन्सनया बिगरमानांकित खेळाडूने पराभवाचा झटका दीला. तर कायले एडमंडया 21वे मानांकन असलेल्या खेळाडूला फ्रान्सीस टायफो या बिगरमानांकित खेळाडूने पराभूत करत आगेकूच केली.
मियामी ओपन टेनिस स्पर्धेत खळबळजनक निकालांची मालीका सुरुच असुन अग्रमानांकित रॉजर फेडररचा बिगरमानांकित थानासी कोक्कीनाकीसने 3-6, 6-3, 7-6(4) असा पराभव करत आगेकूच केली. इंडियन वेल्स मध्ये अंतीम फेरीत पराभवाचा सामना केलेल्या फेडररचा मियामीच्या दुसऱ्याच फेरीत पराभव झाल्याने चाहत्यांमध्ये निराशा पसरली असून थानासीने अत्युच्चदर्जाचा खेळ दाखवताना सामन्यात फेडररला नमवले. सामन्याच्या पहिल्या सेट पासून दोघांनी एकमेकांवर आक्रमण करायला सुरूवात केली. यात पहिल्या सेटमध्ये फेडरर यशस्वी ठरला त्याने पहिल्या सेटमध्ये थानासीचा 3-6 असा पराभव केला. पहिला सेट गमावल्याने दबावात आलेल्या थानासीने पुनरागमन करत फेडररवर हल्ला चढवत त्यच्यावर दबाव वाढवला त्या मुळे दबावात येत फेडररने चुका केल्या त्याचा फायदा घेत थानासीने दुसरा सेट आपल्या नावे केला. यावेळी दुसऱ्या सेट मध्ये पराभव झाल्याने फेडरर काहिसा पिछाडीवर गेला त्यामुळे त्याला आपल्या वरिल दबाव हटवता आला नाही आणि त्याने तिसरा सेट 7-6(4) असा गमावत सामना गमावला.
तर दुसऱ्या सामन्यात ऍड्रीयन मन्नारीनोया 18वे मानांकन असणाऱ्या खेळाडूला स्टीव जॉन्सनया बिगरमानांकित खेळाडूने पराभवाचा झटका दीला. स्टीवने ऍड्रीयनला 6-3, 6-3 असे सरळ सेट मध्ये पराभूत केले. सुरुवातीला हा सामना ऍड्रीयन एकतर्फी जिंकेल असे वाटत होते परंतू स्टीवने त्याच्या अपेक्षांवर पानी फिरवत एकतर्फी ही लढत आपल्या नावे केली. तर स्पर्धेत आणखीन एक खळबळजनक निकाल लागला असून कायले एडमंडया 21वे मानांकन असलेल्या खेळाडूला फ्रान्सीस टायफो या बिगरमानांकित खेळाडूने पराभूत करत आगेकूच केली आहे. फ्रान्सीसने कायलेचा 7-6(4), 4-6, 7-6(5) असा संघर्षपुर्ण पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला.
सिमोना हालेप देखील स्पर्धेतून बाहेर 
महिला विभागातील सामन्यांमध्ये सिमोना हालेपचा ऍग्निएझ्का राडवांस्काने 3-6, 6-2, 6-3 असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. अग्रमानांकीत हालेप इंडियन वेल्स मध्ये देखील बिगरमानांकित खेळाडू कडून पराभूत होउन स्पर्धेतून बाहेर झाली होती. सामन्यात सुरुवातीला हालेपने ऍग्निएझ्कावर हल्ला चढवताना पहिला सेट 6-3 असा आपल्या नावे केला होता. मात्र पहिल्या सेट मध्ये मिळालेल्या विजयामुळे हालेप दुसऱ्या सेट मध्ये काहिशी गाफील राहीली याचा फायदा घेत ऍग्निएझ्काने दुसरा सेट 6-2 असा आपल्या नावे केला. दुसऱ्या सेट मध्ये पराभुत झाल्याने दबावात आलेल्या हालेपने तिसरा सेट देखील 6-3 असा गमावला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)