रॉजर फेडरर ऑस्ट्रेलियन ओपनचा विजेता…

२० व्या ग्रँडस्लॅम ट्रॉफीवर कोरले नाव…

मेलबर्नः  टेनिसचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडररच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत ३६ वर्षीय फेडररने कारकिर्दीतील विक्रमी २० व्या ग्रँडस्लॅम ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. तब्बल तीन तास चाललेल्या झंझावाती सामन्यात क्रोएशियाच्या मारीन चिलिचवर फेडररने ६-२, ६-७, ६-३, ३-६, ६-१ अशी मात केली. तरुणांना लाजवेल असा खेळ करत, झुंजार चिलिचची पाच सेटची झुंज मोडून काढत फेडररने सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली. हे त्याचे २० वे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. तसेच हा पराक्रम करणारा तो एकमेवाद्वितीय पुरुष टेनिसपटू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)