रॉजर फेडररचे विक्रमी ग्रॅण्ड स्लॅम

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत सिलीचवर मात

सर्वाधिक ग्रॅण्ड स्लॅम जिंकणारे खेळाडू


रॉजर फेडरर (स्विझर्लंड) – 20 ग्रॅण्ड स्लॅम


राफेल नदाल (स्पेन) – 15 ग्रॅण्ड स्लॅम


पीट सॅम्प्रास (अेमरिका) – 14 ग्रॅण्ड स्लॅम


रॉय अमरसन (ऑस्ट्रेलिया) – 12 ग्रॅण्ड स्लॅम


नोव्हाक जोकोविच (सर्बिया) – 12 ग्रॅण्ड स्लॅम

मेलबर्न – गतविजेता व द्वितीय मानांकित रॉजर फेडरर याने मेरिन सिलिचला तब्बल 3 तास तीन मिनीटांपर्यंत चाललेल्या मॅरेथॉन सामन्यात 6-2, 6-7 (5-7), 6-3, 3-6 आणि 6-1 असे पराभूत करत कारकिर्दीतील 20वे ग्रॅण्ड स्लॅम जिंकले. मेलबर्न येथे झालेल्या अंतिम सामन्यात फेडररने पहिला, तिसरा आणि पाचवा सेट जिंकत ही विक्रमी कामगिरी केली.

-Ads-

पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रॅण्ड स्लॅम जिंकणारा तो खेळाडू ठरला आहे. तसेच त्याने सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच आणि ऑस्ट्रेलियाच्या रॉय अमरसन यांनी 6-6 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याचा केलेल्या विक्रमाशी बरोबरी साधली. फेडररची ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याची ही 30वी वेळ होती. स्विझर्लंडचा “एंजलेस वंडर’ म्हणून ओळखला जाणाऱ्या 36 वर्षीय फेडरर आणि क्रोएशियाचा 29 वर्षीय सिलीच यांच्यात आतापर्यंत 10 सामने झाले आहेत. यात 9 वेळा रॉजर फेडरर विजयी, तर एकदा सिलिच विजयी झाला आहे. सिलिचने 2014 मध्ये अमेरिका ओपनमध्ये फेडररचा पराभव केला होता.

फेडररला अश्रू अनावर
गेल्या काही वर्षात कुठलीही ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकल्यानंतर फेडररच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात, हे चाहत्यांना ठाऊकच आहे. पण, आज हे अश्रू थांबतच नव्हते. ऑस्ट्रेलियन ओपनची झळाळती ट्रॉफी स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना त्याचा कंठ दाटून येत होता. तसेच आपल्या टीमचे, कुटुंबाचे आभार मानताना तर त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)