#रॉजर्स चषक टेनिस स्पर्धा: डोलेहाईडला नमवून व्हीनस विल्यम्सची विजयी सलामी

मॉंट्रियल: अत्यंत चुरशीच्या लढतीत अमेरिकेच्या कॅरोलिन डोलेहाईडचे कडवे आव्हान मोडून काढताना 14व्या मानांकित व्हीनस विल्यम्सने रॉजर्स चषक टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीत विजयी सलामी दिली. ज्युलिया जॉर्जेस, ऍना कॉन्टाव्हेट आणि ऍनास्तेशिया माकारोव्हा या खेळाडूंनीही आपापले सामने जिंकताना दुसऱ्या फेरीत धडक मारली.

केवळ 19 वर्षे वयाच्या डोलेहाईडने व्हीनसविरुद्ध पहिल्या सेटमध्ये 3-1 अशी आघाडी घेत खळबळजनक निकालाची तयारी केली होती. परंतु 38 वर्षीय व्हीनसने आपला खेळ उंचावताना 4-3 अशी आघाडी घेतली. डोलेहाईडने प्रत्येक गुणासाठी झुंज दिल्यानंतरही व्हीनसने अखेर पहिला सेट 7-5 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र संपूर्ण वर्चस्व गाजविताना व्हीनसने 7-5, 6-1 अशी बाजी मारली. व्हीनसने 1998 मध्ये ग्रॅंड स्लॅम चषक स्पर्धेत कारकिर्दीतील पहिले प्रमुख विजेतेपद पटकावले, तेव्हा डोलेहाईडचा जन्मही झाला नव्हता. व्हीनससमोर आता सोराना सिर्स्टिया किंवा मोनिका निकोलेस्क्‍यू यांच्यातील विजयी खेळाडूचे आव्हान आहे. अन्य सामन्यात ज्युलिया जॉर्जेसने पहिला सेट गमनावल्यावर झुंजार पुनरागमन करताना हंगेरीच्या तिमिया बाबोसचे आव्हान 3-6, 7-6, 6-4 असे संपुष्टात आणले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अडीच तासांहून अधिक काळ रंगलेल्या या सामन्यात जॉर्जेसने 17 बिनतोड सर्व्हिस केल्या. जॉर्जेसला दुसऱ्या फेरीत झेक प्रजासत्ताकाच्या ल्यूसी साफारोव्हाशी झुंज द्यावी लागेल. आणखी एका लढतीत इस्टोनियाच्या ऍनेट कॉन्टाव्हेटने रशियाच्या एकेटेरिना माकारोव्हाचा संघर्षपूर्ण लढतीत 4-6, 6-3, 6-1 असा पराभव करीत विजयी सलामी दिली. तसेच लात्वियाच्या ऍनेस्तेशिया सेवास्तोव्हाने सर्बियाच्या अलेक्‍झांड्रा क्रुनिकचा 6-1, 6-0 असा धुव्वा उडविताना दुसऱ्या फेरीत धडक मारली. महिला दुहेरीत युजेनी बाऊचार्ड व स्लोन स्टीफन्स या जोडीने गॅब्रिएला डाब्रोव्हस्की व यिफान झु यांच्यावर 6-4, 4-6, 1-0 अशी मात करताना पहिली फेरी पार केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)