रेहेकुरी, रूईगव्हाणला रास्तारोको

कर्जत – मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला कर्जत तालुक्‍यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्‍यातील कुळधरण, राशीन, सिद्धटेक, शिंदे, सुपेकरवाडी आदी ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. रेहेकुरी अभयारण्य, रूईगव्हाण आदी ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने रास्तारोको आंदोलन केले. अनेक ठिकाणी रस्त्यावर टायर पेटवून देत आंदोलकांनी शासनाचा तीव्र निषेध केला.

आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी मराठा समाजाने गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. कर्जत तालुक्‍यात त्याचे पडसाद उमटले. रास्तारोको, बंद, ठिय्या अशा विविध मार्गांनी ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक गावांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनामुळे शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. सकाळपासूनच राशीन, कुळधरण, सिद्धटेक, शिंदे आदी ठिकाणी व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळला. अत्यावश्‍यक सेवा बंदमधून वगळण्यात आल्या होत्या.

-Ads-

रेहेकुरी अभयारण्य, रूईगव्हाण येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संतप्त आंदोलकांनी रस्त्यावर टायर पेटवून देत निषेध व्यक्त केला. रेहेकुरीत आंदोलकांनी तलाठी व मंडल अधिकारी यांना निवेदन दिली. शासन निषेधाच्या घोषणा देत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आंदोलकांनी केली. राशीन या मोठ्या बाजारपेठेच्या ठिकाणी बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट होता.

आठवडे बाजार असलेल्या माहिजळगाव, भांबोरा, वडारवस्ती आदी ठिकाणी शुक्रवारी आंदोलने होणार आहे. कर्जतच्या तहसील कार्यालयासमोर गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.रथयात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने कर्जत येथे आंदोलन करण्यात आले नाही.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)