रेश्‍मा मारूरी, पवित्रा रेड्डी, आर्या पाटील, विपाशा मेहरा, स्वरदा परब यांचा दुसऱ्या फेरीत प्रवेश 

एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा 

पुणे – रेश्‍मा मारूरी, पवित्रा रेड्डी, आर्या पाटील, विपाशा मेहरा, स्वरदा परब व रेनी शर्मा या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा वेगवेगळ्या शैलीत पराभव करताना एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेतील मुलींच्या एकेरीतील दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेने रवाईन हॉटेल यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

-Ads-

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेतील 16 वर्षांखालील मुलींच्या गटातील पहिल्या फेरीत पात्रतावीर रेश्‍मा मारूरी हिने वैष्णवी आडकरचा पहिला सेट गमावल्यावर झुंजार पुनरागमन करताना टायब्रेकरमध्ये 4-6, 7-6 (4), 7-6 (3) असा संघर्षपूर्ण पराभव केला. तसेच पवित्रा रेड्डीने मधुरिमा सावंतवर 6-2, 7-6 (4) अशा फरकाने विजय मिळवताना मुलींच्या गटात पहिल्या फेरीची वेस ओलांडली. मुलींच्या गटातील पहिल्या फेरीच्या अन्य लढतीत अपूर्वा वेमुरीने निर्मयी सुरापूरचा 6-1, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तर आर्या पाटीलने संजुक्‍ता विक्रमचा 7-5, 6-1 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. आणखी एका लढतीत विपाशा मेहराने रिया वाशीमकरचे आव्हान 6-4, 6-1 असे संपुष्टात आणले. तसेच स्वरदा परब हिने रिद्धी काकर्लामुदीला 6-1, 6-2 असे नमविताना दुसऱ्या फेरीत धडक मारली.

सविस्तर निकाल – 
16 वर्षांखालील मुली – पहिली फेरी – कोतिष्ठा मोडक वि.वि. मृणाल कुरळेकर 6-2, 6-3; श्रेष्ठा पी वि.वि. अमूल्या गणपावरापू 6-2, 6-4; पवित्रा रेड्डी वि.वि. मधुरिमा सावंत 6-2, 7-6(4); रेश्‍मा मारूरी वि.वि. वैष्णवी आडकर 4-6, 7-6(4), 7-6(3); अपूर्वा वेमुरी वि.वि.निर्मयी सुरापूर 6-1, 6-3; आर्या पाटील वि.वि. संजुक्‍ता विक्रम 7-5, 6-1; सुहिता मारूरी वि.वि. निवेदिता शंकर 6-4, 6-0; वेदा रानबोथु वि.वि. आर्णी रेड्डी 6-3, 5-7, 6-1; विपाशा मेहरा वि.वि. रिया वाशीमकर 6-4, 6-1; रेनी शर्मा वि.वि. अभया वेमुरी 6-3, 7-5; स्वरदा परब वि.वि. रिद्धी काकर्लामुदी 6-1, 6-2.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)