रेशीम शेतीबाबत केंद्र सरकारने उचलले महत्त्वाचे पाऊल

नवी दिल्ली : केंद्र सरकार येत्या काळात रेशीम क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देणार आहे, अशी माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग आणि माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी दिली.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार बैठकीत त्या बोलत होत्या. जेव्हा बाजारपेठेत चांगल्या प्रतीच्या वस्तू येतील, तेव्हा बाजारपेठ देखील वाढेल आणि यासाठी भारत सरकार रेशीम क्षेत्रातील पायाभूत सुविधेवर ८० टक्के खर्च करेल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. केंद्रासोबत राज्यातील रेशम व्यवसायाला प्रगत करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांसाठी वेब-आधारित संकेतस्थळ निर्माण केले जाईल. तसेच बीज उद्पादकांना देखील मदत पुरविली जाईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

बाजारपेठेला ध्यानात घेवून विशेष लक्ष दिले जाईल. रेशीम व्यवसायात जे शेतकरी काम करीत असतील त्यांना एक मदत क्रमांक दिला जाईल. सध्या भारतात ८ रेशम केंद्र आणि १९ रेशीम उद्पादन केंद्र बनविले जातील, असे त्या यावेळी म्हणाल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)