रेशम टिपणीसचे टीव्हीवर दणक्‍यात पुनरागमन !!!

 

गतकाळातील लोकप्रिय अभिनेत्री रेशम टिपणीस ‘ऍन्ड टीव्ही’वरील आगामी ‘हाफ मॅरेज’ या मालिकेतून पुन्हा एकदा टेलिव्हिजनच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. रेशम टिपणीस जानकीची भूमिका करणार आहे. मालिकेचा नायक अर्जुन शर्मा (तरुण महिलानी) याची ही आत्या आहे. ती काहीशी अधिकार गाजवणारी आहे. कुटुंब प्रमुख असलेली जानकी दुष्ट आणि कपटीही आहे. पण अशा बहुढंगी व्यक्तीमत्वाला एक विनोदाची किनारही आहे. जानकीने एकेकाळी ब्युटी क्‍विनचा किताब जिंकला आहे. त्यामुळे आपलं सौंदर्य मिरवायला तिला आवडतं. इतकंच नाही, ती स्वत:च्या मुलींसोबतही स्पर्धा करत असते!

याबद्दल रेशम म्हणाली, “”मी या आधीही राजश्रीसोबत काम केलं आहे. हे माझं दुसरं घरच आहे, असंह म्हणायला हरकत नाही. त्यामुळे “हाफ मॅरेज’मध्ये काम करणं म्हणजे पुन्हा एकदा कुटुंबासोबत असल्यासारखं आहे. मी वर्षभर टेलिव्हिजनपासून दूर होते. कारण मला दर्जेदार काम हवं होतं. त्यामुळेच ऍण्ड टीव्हीची “हाफ मॅरेज’ समोर आली आणि मी लगेच होकार दिला. जानकीची भूमिका फारच छान आहे. नायकाच्या आत्याची भूमिका मी साकारणार आहे. या व्यक्तिरेखेला काही गडद छटाही आहेत. मी नेहमीच आव्हानात्मक भूमिकेच्या शोधात असते. शिवाय, जानकीसारखी भूमिका मी याआधी कधीच टेलिव्हिजनवर साकारली नाही. मला या भूमिकेत पाहणं, हा प्रेक्षकांसाठी एक सुखद बदल असेल, याची मला खात्री आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)