रेशन दुकानदार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी श्रीकांत शेटे

सातारा – सातारा तालुका रेशन दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी श्रीकांत शेटे यांची एकमताने निवड करण्यात आली.
सातारा तालुका स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवाना धारक संघटनेची सभा नुकतीच पार पडली. यावेळी नवीन कार्यकारणीची निवड नुकतीच करण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष सुरेश साळुंखे होते. ज्येष्ठ दुकानदार वनगळचे सुदाम साळुंखे उपस्थित होते.

यावेळी तालुक्‍यातील प्रत्येक सर्कलमधून एक प्रतिनिधी, महिला बचत गटातून एक, सोसायटी दुकानदारातून एक, महिला प्रतिनिधी दोन, आणि इतर असे एकूण 23 जणांची नविन कार्यकारणी निवडण्यात आली. कार्यकारणीमध्ये श्रीकांत शेटे – अध्यक्ष, बबनराव देवरे- उपाध्यक्ष, संजय रजपूत-उपाध्यक्ष, प्रमोद तपासे-सचिव, प्रदिप पवार-उपसचिव, संदिप भणगे – खजिनदार, प्रवीण जाधव-सहखजिनदार, कार्यकारणी सदस्य-शरद देशमुख, मच्छिंद्र मोरे, नगरसेवक सागर (बबलू) साळुंखे, युन्नस मेमन, दिगंबर देवरे, शामराव पिलावरे, लक्ष्मण नावडकर, रामराव निकम, सतिश माने, विकास देशमुख, संदीप सोनमळे, अशोक (आप्पा) पिसाळ, मच्छिंद्र किर्दत, अंजना मोरे, मीना जाधव, उषा होलमुखे यांची एकमताने निवड झाली. या सर्व निवडी खेळीमेळीच्या वातावरणात एकमुखी झाल्या.

सभेत माजी अध्यक्ष सुरेश साळुंखे, माजी अध्यक्ष तानाजी गुजर यांच्या कार्याचा गौरव करून शाल, बुके देवून सन्मान करण्यात आला. तानाजी गुजर परगावी असल्याने त्यांच्यावतीने माजी उपाध्यक्ष बापू नलवडे यांचा सन्मान करण्यात आला. बबनराव देवरे यांनी आभार मानले. सभा यशस्वी होण्यासाठी सर्व दुकानदारांनी सहकार्य केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)