रेशनिंगवर तूरडाळ 35 रुपये किलो दराने

मुंबई – कर्नाटक व तामिळनाडू राज्याच्या पाश्वभूमिवर महाराष्ट्रात शिधा वाटप दुकानावर सध्या दिल्या जाणाऱ्या तुरडाळीच्या दरात राज्य सरकारने मोठी कपात करून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. स्वस्त धान्य दुकानातून सध्या विक्री करण्यात येत असलेली तूरडाळ आता प्रति किलो 35 रुपयांप्रमाणे विक्री केली जाणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली.

कर्नाटक व तामिळनाडू या राज्यांमध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत तूरडाळीचा पुरवठा अनुक्रमे 38 रुपये आणि 30 रुपये प्रति किलो याप्रमाणे केला जातो. सद्या राज्यात 55 रूपये प्रति किलो याप्रमाणे तुरडाळीची विक्री केली जात होती.

या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत कमीत कमी किंमतीत तूरडाळीची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे शासनाचे सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था, पूर्णतः अथवा अंशतः अनुदानित संस्था याद्वारे होणारी तूरडाळीची खरेदी पुढील आदेश होईपर्यंत फक्त महाराष्ट्र राज्य पणन महासंघाकडून शासकीय दराने करण्यास बंधनकारक करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)