रेशनसाठी पाळीव कुत्र्याला मुलगा म्हणुन दाखवले

वर्षभरापासून कुत्र्याला मुलगा दाखवून घेत होता रेशन
इंदूर – भारतात सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी काहीही केलं जाऊ शकतं याचा प्रत्यय मध्य प्रदेशात सरकारी अधिकाऱ्यांना आला आहे. रेशन कार्डाच्या साहाय्याने एक वृद्ध व्यक्ती त्याचा मुलगा राजू याच्या नावावर गेले वर्षभर रेशन घेत होता. पण राजू हा त्यांचा मुलगा नसून त्यांच्या पाळीव कुत्र्याचं नाव असल्याची धक्कादायक माहिती आधारकार्डद्वारे केलेल्या पडताळणीनंतर उघडकीस आली आहे.

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात एका दुर्गम गावात हा प्रकार घडला आहे. नरसिंह बोडार (75) असं रेशन घेणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. नरसिंह गेल्या वर्षभरापासून रेशनच्या दुकानातून त्यांचा पाळीव कुत्रा राजूच्या नावावर 60 किलो गहू आणि तांदूळ स्वस्त दरात विकत घेत होते. सरकारी अधिकारी नरसिंह यांच्या घरी पडताळणीसाठी गेले असताना ही बाब उघडकीस आली. रेशन कार्डावर नमूद असलेल्या व्यक्तींची अधिकाऱ्यांनी विचारपूस केली असता नरसिंह आणि त्यांची पत्नी समोर आली. पण राजूला बोलवण्यात आलं आणि कुत्रा समोर येताच अधिकाऱ्यांना धक्काच बसला. अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. रेशन कार्ड हे स्थानिक पंचायत समिती कार्यालयातून देण्यात आल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, सरकारी सेवेचा लाभ घेणाऱ्यांचे आधार कार्ड तपासण्याचे आदेश वरिष्ठांकडून आले. यामुळे रेशन दुकानदाराने नरसिंह यांच्याकडे त्यांच्या रेशन कार्डवर नोंदवण्यात आलेल्या तीन व्यक्तींचे आधार कार्ड मागितले. यावर नरसिंह यांनी फक्त दोनच आधार कार्ड दुकानदाराला दाखवले. यामुळे दुकानदाराने तिसऱ्या राजू नामक व्यक्तीचे आधार कार्ड कुठे आहे असे नरसिंह यांना विचारले. त्यावर राजू व्यक्ती नसून आमचा पाळीव कुत्रा आहे. तो माझा मुलगाच आहे, असे नरसिंह यांनी सांगितले. नरसिंह यांचे हे उत्तर ऐकून दुकानदार व वरिष्ठ अधिकारी हैराण झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)