रेशनवरील उडीद डाळीच्या किंमतीमध्ये वाढ

पुणे – मागील आठवड्यात राज्य शासनाने रेशनकार्डवर चणा डाळ व उडीदडाळ 35 रुपये प्रतिकिलो या दराने देण्याचे जाहीर केले होते. आता मात्र, शासनाने विक्रीच्या दरात बदल केला आहे. त्यानुसार उडीद डाळ विक्रीच्या दरात नऊ रुपयांनी वाढ केली असून ही डाळ रेशनकार्डवर 44 रुपये प्रतिकिलो या दराने मिळणार आहे.

केंद्र शासनाने खरेदी केलेली चणा व उडीद डाळांची भरडाई करून प्राप्त होणारी चणाडाळ व उडीद डाळ राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय, अन्न सुरक्षा योजना व प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी यांना अनुदानित दराने उपलब्ध करून देण्यात येत आहे. मागील आठवड्यात शासनाने रेशनवर चणा व उडीदडाळ 35 रुपये प्रतिकिलो या दराने देण्याचा निर्णय जारी केला. आता मात्र ई-निविदा प्रक्रियेमध्ये उडीदचा प्राप्त झालेला उतार अपेक्षेपेक्षा कमी आल्याने उडीदडाळीच्या वितरीत करण्याच्या दरात बदल केला असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार शासनाने 35 रुपये प्रति किलो या दराने देण्यात येणारी उडीदडाळ विक्रीच्या दरात शासनाने नऊ रुपयांची वाढ करत 44 रुपये प्रति किलो या दराने डाळ मिळणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात मिळणारी डाळ आता महाग झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)