रेशनकार्ड धारकांची दिवाळी यंदा गोड

पुणे – शासनाकडून दिवाळीनिमित्त रेशनवर जादा साखर, उडीद डाळ आणि चणा डाळ उपलब्ध करून दिली आहे. अंत्योदय आणि अन्नसुरक्षा योजनेतील शहरातील सुमारे 2 लाख 80 हजार रेशनकार्ड धारकांना याचा लाभ मिळणार आहे. पुढील आठवड्यापासून स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्य मिळण्यास सुरुवात होणार आहे.

सर्वसामान्यांची दिवाळी अधिक गोड व्हावी, यासाठी सणासुदीच्या काळात शासनाकडून जिल्हा प्रशासनाला साखरेचा जादा कोटा उपलब्ध करून दिला जातो. त्यानुसार अंतोदय आणि अन्न सुरक्षा योजनेतील कार्ड धारकांना 1 किलो साखर, 1 किलो उडीद डाळ आणि 1 किलो चणा डाळ मिळणार आहे. दिवाळीच्या आधी हे अन्नधान्य लाभार्थ्यांना देण्याच्या सूचना प्रशासनाकडून स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. पुढील आठवड्यापासून रेशन दुकानातून हे अन्नधान्य वितरण होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)