रेल्वे हद्दीतील विस्थापितांना दिलासा

पुनर्वसनासाठी प्रयत्न करण्याचा मकरंद पाटील यांचा शब्द
लोणंद, दि. 8 (प्रतिनिधी) – लोणंद रेल्वे स्थानकाजवळ अनेक वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या बेघरातील लोकांना रेल्वे प्रशासनाने नोटीस बजावून जागा मोकळी करण्याचे आदेश दिले आहेत. या नोटीसीने या लोकांची झोप उडाली असून ते सैरभैर झाले आहेत. आमचे घर तोडू नका, असा टाहो ते रेल्वे प्रशासनासमोर फोडत असताना आमदार मकरंद पाटील यांनी या विस्थापितांना समक्ष भेटुन चर्चा केली व समस्या जाणून घेतल्या. तसेच त्वरित जिल्हाधिकारी सातारा यांना आणि संबंधित विविध प्रशासकीय अधिकारी यांना संपर्क साधुन या समस्येचे निवारण करण्यासाठी सुचना केल्या. जोपर्यंत या बेघर विस्थापितांचे योग्य रितीने पुनर्वसन होत नाही तोपर्यंत हे आहे याच जागेवर निवास करतील अशी भूमिका घेत याबाबत रेल्वे प्रशासनास भेटुन योग्य रितीने तुमचे पुनर्वसन करण्यासाठी या भागाचा प्रतिनिधी म्हणून मी तत्पर आहे, असा शब्द यावेळी या विस्थापितांना आमदार मकरंद आबा पाटील यांनी दिल्याने या विस्थापितांना दिलासा मिळाला आहे.
यावेळी खंडाळा तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष दत्तानाना ढमाळ, स्विकृत नगरसेवक सुभाष घाडगे, लोणंद फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. किशोर बुटीयाणी, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव गजेंद्र मुसळे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सागर शेळके, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे खंडाळा तालुका अध्यक्ष गणेश धायगुडे, लोणंद फाउंडेशनचे सचिव कय्युमभाई मुल्ला, मानवता प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. वैभव धायगुडे, कापडगावचे सत्यजित खताळ, मकरंद आबा पाटील पतसंस्थेचे तज्ञ संचालक दीपक पारखे, व्यापारी अजितदादा घुगरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रेल्वे बेघर विस्थापित आपल्या कुटुंबियांच्यासह बहुसंख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)