रेल्वे स्वच्छतागृहे सुधारणेसाठी 300 कोटींची तरतूद

नवी दिल्ली: देशभरातील रेल्वे स्थानकांवरील जुनी स्वच्छतागृहे दुरूस्त करण्यासाठी तसेच नवीन उभारण्यासाठी भारतीय रेल्वेने एकूण तिनशे कोटी रूपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. चालू वर्षात रेल्वेने 1400 स्थानकांवरील 1800 स्वच्छतागृहांची दुरूस्ती करून 200 नवीन स्वच्छतागृहे बांधली आहेत अशी माहिती रेल्वेमंत्रालयाच्यावतीने देण्यात आली आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशातील 2700 स्थानकांवर 2700 स्वच्छतागृहे बांधण्याचा प्रस्ताव आहे.

सीएसआर योजने अंतर्गत रेल्वे स्थानकाच्या आसपास राहणाऱ्या नागरीकांच्या सोयीसाठीही काही ठिकाणी स्वच्छतागृहे बांधली जाणार आहेत. रेल्वे स्थानकाच्या आसपास राहणारे लोक रेल्वेच्या सुविधेचा व स्वच्छतागृहांचा वापर करून ती खराब करीत असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यावरही रेल्वेने भर दिला आहे असे मंत्रालयाने म्हटले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)