रेल्वे स्टेशनच्या गेटसमोर मोबाईल हिसकावला

पुणे- मोबाईल हिसकावल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी पहाटे पुणे रेल्वे स्टेशनच्या इन गेटसमोर घडली.

फिर्यादी अमीर सैय्यद (35, मंगळवार पेठ) हे गुडलक बेकरी येथे केक घेण्यासाठी पहाटे दिडच्या सुमारास आले होते. यावेळी तीन व्यक्ती त्यांच्या जवळ आल्या. यानंतर त्यांनी फिर्यादीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. फिर्यादी आरडाओरडा करण्याअगोदरच ते दुचाकीवर बसून फरार झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)