रेल्वे विभागात नोकरी लावण्याच्या अमिषाने 95 लाखांची फसवणूक

रेल्वे विभागात उच्च पदावर कार्यरत असल्याचा बनाव करून पैसे उकळले
पुणे – रेल्वे खात्यात उच्च पदावर कार्यरत असल्याचे सांगत कायमस्वरुपी नोकरी लावून देण्याच्या आमिषाने 95 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हिरकणी सुदाम धुर्वे (वय 45, आळंदी देवाची, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन फारूख शेख उर्फ पटेल (50, रा. भुसावळ, जि. जळगाव), वसीम शेख (25) आणि नाजिया शेख (45) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार मे 2017 ते एप्रिल 2018 दरम्यान घडला. फिर्यादी महिला या गृहिणी असून आळंदीत रहायला आहेत. आरोपी फारुख शेख याने आपण रेल्वे विभागात उच्च पदावर कार्यरत असून आजवर अनेक मुलांना रेल्वेत काम लावून दिल्याचे फिर्यादीला सांगितले. तसेच मी आणखील पाच मुलांना रेल्वे विभागात कायमस्वरुपी नोकरी लावू शकतो, असे फिर्यादीला भासवले. यानंतर फिर्यादी यांना जर्मन बेकरी हॉटेलमध्ये बोलावून फिर्यादी यांच्यासोबत आलेल्या मुलांचे फॉर्म भरुन घेतले.

फॉर्म भरुन त्यांना लेखी परीक्षेत आपण पास करून देऊ, असे आश्‍वासन दिले. यानंतर फिर्यादींचा विश्‍वास संपादन करून वेळोवेळी त्यांच्याकडून रोख व ऑनलाइन पद्धतीने एकूण 95 लाख रुपये उकळले. यानंतर मुलांची नियुक्‍ती झाली असल्याचे सांगून फिर्यादींना बनावट कागदपत्रे सादर केली. मात्र, अनेक दिवस उलटूनही रेल्वे विभागाकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने फिर्यादीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर फिर्यादींनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. कोरेगाव पार्क पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ए. आर. रावडे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)