रेल्वे लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

नगरच्या तिघांना सातारा रेल्वे पोलिसांकडून अटक
नगर – सातारा, जळगाव, भुसावळ, नाशिक, सोलापूर, हैद्राबाद, गुंतकल या ठिकाणी रेल्वेचे सिग्नल तोडून प्रवाशांचे पैसे, सोने, मोबाईल व अन्य मौल्यवान वस्तू लुटणाऱ्या टोळीचा सातारा रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी नगर जिल्ह्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे.
रोहित गोरख रलेभात (वय 24), विनोद सखाराम जाधव (वय 30), बाबू मोहन कसबे (वय 25, सर्व रा. जामखेड, जि. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या टोळीने सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर, सालपे, आदर्की, पळशी, शेणोली याठिकाणी चोरी केल्याचे कबुली दिली आहे. अटकेतील आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या व रेल्वे सिग्नल तोडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले.
या टोळीकडून वेगवेगळ्या ठिकाणच्या रेल्वेमधील ते गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्‍यता आहे. या टोळीतील ते साथीदार फरार झाले आहेत. वरिष्ठ सुरक्षा आयुक्त पुणे डी. विकास, सहा.सुरक्षा आयुक्त मकरारिया यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय एन. संसारे, हवालदार शहाजी जगताप, कॉ. विजय पाटील कॉ.पंकज डेरे यांच्या टीमने ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)