रेल्वे रुळांलगतची घरे हटविणे अशक्‍य

त्रासदायक न ठरणारे पार्किंग धोरण आणू

महापालिकेच्यावतीने शहरात राबविण्यात येणाऱ्या पार्किग धोरणाबाबत माझी पालकमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. अधिवेशन झाले, की आम्ही सर्व पालिका पदाधिकारी तसेच पालकमंत्री एकत्रित बसून या धोरणामध्ये काही त्रुटी राहिल्या आहेत काय, याचा अभ्यास करणार आहोत. तसेच पुणेकरांना हे धोरण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्रासदायक वाटणार नाही, अशा पद्धतीनेच त्यांची आखणी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. मुख्यसभेतही याबाबत काही उपसूचना देण्यात आल्या आहेत. त्यासुद्धा मान्य करण्यात येणार आल्या आहेत. त्याचासुद्धा विचार करण्यात येणार आहे, असेही शिरोळे म्हणाले.

रेल्वेमंत्र्यांशीही चर्चा: रेल्वेच्या जागांवरील घरांचे होणार सर्वेक्षण
तोडगा काढण्यासाठी खासदार शिरोळेंचे प्रयत्न

पुणे – रेल्वेच्या जागांवर मोठ्या प्रमाणावर घरे आहेत. वर्षानुवर्षे असणारी ही घरे आता हटविणे शक्‍य नाही. त्यामुळे तोडगा काढून येथील लोकांना दुसरीकडे कुठे नवीन घरे देता येतील का, याचा विचार लवकरच करण्यात येणार आहे. त्याबाबत हालचाली सुरू झाल्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी सांगितले.
शहरात तसेच परिसरात अनेक ठिकाणी रेल्वेच्या जागेत तसेच रेल्वे रुळालगत अनेक ठिकाणी घरे आहेत. या घरांना महापालिकेने नळ जोड दिले आहेत. वीज जोडणीसुद्धा देण्यात आली आहे.त्यामुळे आता ही घरे पाडली, तरी तेथे पुन्हा घरे होतील. हा त्रास सोडविण्यासाठी याबाबत अनिल शिरोळे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याबरोबर नुकतीच चर्चा केली. त्यावेळी त्यांनी “मुख्यमंत्र्याशी बैठक करुन काय तो निर्णय घ्या. मी त्याला तयार आहे’, असे सांगितले. त्यामुळे आता मुख्यमंत्र्याबरोबर बैठक घेण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक आहेत.अधिवेशन संपल्यानंतर ही बैठक होणार असल्याचे शिरोळे म्हणाले.

त्यादरम्यान, पुणे शहर परिसरातील रेल्वेच्या जागांवर किती घरे आहेत, त्याचा सर्व्हे करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार निश्‍चित आकडेवारी स्पष्ट झाली, की मग घरे देणे सोपे जाणार आहे. 2022 पर्यंत सर्वांना हक्काचे घर मिळाले पाहिजे, हे मिशन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शिरोळे म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)