रेल्वे भरतीची तारिख बदला

पिंपरी – महाराष्ट्रात 9 ऑगस्ट रोजी मेगा भरती होत आहे. हा क्रांती दिन असल्याने भरतीची तारीख बदलण्यात यावी, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना निवेदन देऊन मागणी केली.

निवेदनात म्हटले आहे की, मेगा भरतीसाठी सर्व महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून उमेदवारांना भरतीसाठी केंद्रावर जावे लागणार आहे. परंतु, दि. 9 ऑगस्ट हा क्रांती दिवस असल्याने या दिवसापासून मराठा मोर्चाच्या आयोजकांनी संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचे ठरविले आहे. यामुळे अनेक युवक व युवतींना या मेगा भरतीच्या ठिकाणी जाता येणे शक्‍य नाही. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून या मेगा भरतीची 8 ऑगस्ट किंवा 10 ऑगस्ट रोजी घेण्यात यावी, असे खासदार बारणे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)