रेल्वे “ब्लॉक’मुळे प्रवासी हैराण

पिंपरी – गणेशोत्सवाची धामधूम सुरु असताना रेल्वे प्रशासनाने लोकलच्या 20 दिवस काही फेऱ्या रद्द केल्या आहेत. खास गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळ (एस. टी) व पीएमपीएमएल प्रशासन जादा गाड्या सोडत असताना रेल्वेने मात्र फेऱ्या रद्द केल्याने गौरी-गणेशोत्सात प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

रेल्वे प्रशासनाने 10 ते 30 सप्टेंबर या कालावधीत दररोज तीन तास रेल्वे रुळाचा बिघाड, सिग्नल दुरुस्ती व इतर काही कामे करण्याकरीता लोकलच्या 4 फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यात पुण्यावरुन लोणावळ्याला जाणाऱ्या लोकलच्या दोन फेऱ्या रद्द झाल्या आहेत. सव्वा बारा वाजताची 99816 क्रमांकाची गाडी व परत दुपारी एक वाजताची गाडी रद्द करण्यात आली आहे. तर लोणावळ्यावरुन पुण्याला येणारी दुपारी दोन आणि 3 वाजून 25 मिनिटांची गाडी अशा 4 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सवामुळे पीएमपीएमएलला मोठ्‌या प्रमाणावर गर्दी असते. अशा परिस्थितीमध्ये लोकल सोईची ठरत असताना ऐन गणेशोत्सवात रेल्वेच्या फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांना गैरसोईचा सामना करावा लागणार आहे. याचा फटका सर्वात जास्त पिंपरी रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना बसला आहे. पिंपरी येथे मोठ्या प्रमाणात गणेश-गौरीच्या सजावटीचे साहित्य विकत घेण्याकरिता खडकीपासून ते लोणावळ्यापर्यंत नागरिक येतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)