रेल्वे प्रशासनाविरोधात वाठार स्टेशन ग्रामस्थ रस्त्यावर

वाठार स्टेशन – वाठार स्टेशन येथे रेल्वे प्रशासनाने मागण्यांची पूर्तता न करताच अचानक गेट न. 45च्या मधोमध खडी टाकल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. रेल्वे प्रशासनाबरोबर दोनवेळा समन्वय बैठका घेवूनहर ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांना कोणतीही पूर्व कल्पना न भुयारी मार्ग बनवण्याचे काम सुरू केल्याने ग्रामस्थ गेटजवळ जमा झाले. यावेळी सपोनि विश्वजीत घोडके यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. ग्रामस्थांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकांसंदर्भात ग्रामस्थांनी घोडके यांना माहिती दिली. घोडके यांनी तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून याची माहिती दिली. त्यानंतर खडी बाजुला करून वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश वाठार पोलीस ठाण्याला दिले गेले. यानंतर ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा मागे घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)