रेल्वे प्रशासनाचा अजब-गजब कारभार

नाणे : कामशेत-नाणे रोडवर रेल्वे फाटकाजवळील गेटमनच्या केबीनच्या पक्‍क्‍या बांधकामाला गळती लागल्याने त्यावर नव्याने पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे.

गेटमनच्या पक्‍क्‍या केबीनला पत्र्याचे छत

नाणे-मावळ – शासकीय कामाच्या निकृष्ट दर्जावर कायम टिका होत असताना या चुका झाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्‍लूप्ती पाहून हसावे की रडावे, अशी नागरिकांची अवस्था होते. असेच एक काम कामशेत-नाणे रस्त्यावर पाहायला मिळते.

रेल्वेने कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास करावा याकरिता विविध ठिकाणी लोहमार्गालगत गेटमनसाठी केबीन उभारली आहे. कामशेत-नाणे येथील लोहमार्गालगत रेल्वे प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी रेल्वे गेट उभारले असून गेटमनसाठी एक केबीन बांधली आहे. मात्र, या केबीनचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने ही केबीन पावसाळ्यात गळू लागली. त्यामुळे तात्पुरता उपाय म्हणून त्यावर ताडपी टाकण्यात आली. मात्र मावळातील मुसळधार पावसासमोर तापडत्रीचा निभाव लागला नाही. त्यामुळे अखेर या केबीनला पाणी गळतीपासून वाचवण्यासाठी चक्क या केबीनवर पत्राशेड उभारण्यात आले आहे. यानिमित्त एका पक्‍क्‍या बांधकामाला पत्राशेड वाचवत असल्याचे अनोखे दृश्‍य मावळवासियांना पाहायला मिळाले. सरकारी कारभाराचा हा एक उत्कृष्ट नमुना म्हणून पाहायला मिळाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)