रेल्वे प्रशासनाकडून बेघर वस्तीवरील कुटुंबांना पुन्हा नोटीस

पर्यायी जागा न दिल्यास तीव्र आंदोलनाचा बेघरवस्तीचा इशारा

लोणंद, दि. 28 (प्रतिनिधी) – लोणंद रेल्वे स्टेशननजीकच्या सरकारी जागेवर वर्षानुवर्ष झोपडी, पत्र्याचे शेड, वाकळापासुनचे छत, आदी छप्पर वजा घर तसेच पाल ठोकून राहणाऱ्या अत्यंत गरीब, बेघर अशा सुमारे अडीचशे कुंटुबांना ही जागा दि. 30 नोव्हेंबरपर्यत खाली करण्यात यावी, अन्यथा पोलीस बंदोबस्तात जेसीबी लाऊन जागा मोकळी केली जाईल, अशी नोटीस नोटिसबोर्डवर रेल्वे प्रशासनाने लावली आहे. या प्रकारामुळे झोपडीतील गरीब कुंटुबे हवालदिल झाली आहेत. यापूर्वी अनेक लोकप्रतिनिधी व संघटना यांच्यावतीने देण्यात आलेले आश्वासन हे आश्वासनच राहिले असून या गरिबांना कोणी वाली उरला नाही. यांना कोणी डोक्‍यावर छताचा आधार देणार आहे की नाही? असा प्रश्न केला जात आहे.
लोणंद शहराच्या पूर्व बाजुस असलेल्या रेल्वे स्टेशन नजीकच्या मोकळ्या जागेत गेल्या अनेक वर्षापासुन दोनशेच्या वर कुंटुबे रहात आहेत. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी, वडार वस्ती, डोंबार, वस्ती, घिसाडी समाज वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर अंत्यत गरिबातील गरिब समाजातील हातावर पोट असणारी, अनेकजण दारोदार फिरून आपला उदर निर्वाह करीत पोटाची खळगी भरून आपले जीवन जगत आहेत. याठिकाणी या गरीब कुंटुबांनी कपड्याचे पाल, पत्र्याचे शेड, कच्चे बांधकाम करून आपली घरे बांधली आहेत. या ठिकाणी रेल्वेच्यावतीने पावर हाऊसची उभारणी करायची आहे. त्यासाठी जागा खाली करायच्या लेखी नोटीसा तीन महिन्यापूर्वी दिल्या होत्या, त्यानंतर या लोकांचे धाबे दणालले होते.
बेघर होणाऱ्या कुंटुबांनी खासदार, आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक आदी लोकप्रतिनिधी व विविध संघटनांची भेट घेऊन न्याय मागीतला होता. यावेळी काही संघटनांच्याववतीने उपोषण, मोर्चा असे आंदोलनही करण्यात आले होते. रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून दिलासा देण्याची मागणी केली होती. प्रथमता सकारात्मक प्रतिसाद रेल्वे प्रशासनाकडून मिळाला होता. पण त्यांनतर पुन्हा आता रेल्वे प्रशासनाने या झोपडी धारकांना वैयक्तीत नोटीसा न देता ठिकठिकाणी नोटीसा बोर्डवर लावण्यात येऊन दि. 30 नोव्हेंबर पर्यत जागा खाली कराव्यात अन्यथा पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने जागा खाली करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. नोटीस बोर्डवर लावल्याने वसाहतीमधील कुंटुबे हवालदिल झाली आहे. आम्हाला पर्यायी जागा देऊन न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. न्याय न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)