रेल्वे प्रवाशांनी घेतली अपघात टाळण्याची शपथ

पिंपरी – रस्ते व रेल्वे मार्गावरील अपघात टाळण्यासाठी चिंचवड प्रवासी संघ व चिंचवड रेल्वे स्थानक कर्मचाऱ्यांच्या वतीने अपघात टाळणार व प्रसंगी अपघात ग्रस्तांना तातडीची मदत उपलब्ध करुन देण्याची शपथ रेल्वे प्रवाशांना देण्यात आली.

रस्त्यावर मृत पावलेले व गंभीर जखमी झालेले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील तिसरा रविवार जागतिक अपघात पिडीत स्मृती दिन म्हणून पाळला जातो. यानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रस्ते व पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी आदी स्थानक व आसपास अनेकजण अपघातात मृत्युमुखी पडले. त्यांच्या चिंचवड स्टेशन रेल्वे प्रवाशांनी आदरांजली अर्पण केली. जे जखमी झाले त्यांना आरोग्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली.

रस्ते व रेल्वे मार्गावरील नियमाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करत सुरक्षित प्रवास व वाहने चालवू अशा आशयाची शपथ रेल्वे कर्मचारी प्रतिक्षा खरात यांनी दिली. चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, चिंचवड रेल्वे स्थानकांचे प्रमुख अनिल नायर, अमित वर्मा, प्रवासी संघाचे पदाधिकारी नारायण भोसले, नंदू भोगले, सतीश शिलम, रामभाऊ सुपेकर, ज्ञानेश्वर घुले, डॉ. जावेद शिकलगार, पृथ्वीराज चव्हाण, आण्णा राव, उषा उघडे, मनीषा पिराजाहाते, मंगल होगले, वर्षा होगले, महावीर घोडमिसे, विजय भगत आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)