रेल्वे प्रवाशांना मिळणार 5 रुपयांत चहा

प्रवाशांच्या तक्रारींनंतर ‘आयआरसीटीसी’ने ठरविले खाद्यपदार्थांचे नवे दरपत्रक


ठरलेल्या दरानुसार खाद्य विकणे बंधनकारक

पुणे- रेल्वेमध्ये विकले जाणारे पदार्थ महाग मिळत असल्याच्या अनेक तक्रारी रेल्वे प्रवाशांनी प्रशासनाकडे केल्या. या अनुषंगाने इंडियन रेल्वे केटरिंग ऍन्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) खाद्यपदार्थांचे दर नुकतेच जाहीर केले. नव्या दरपत्रकामध्ये 90 खाद्यपदार्थांचा समावेश असून पदार्थाचे वजन आणि प्रमाण निश्‍चित करण्याबरोबरच दरदेखील बंधनकारक करण्यात आले आहेत. यामुळे आता नव्या दरानुसार रेल्वे प्रवाशांना अवघ्या 5 रुपयांत चहा उपलब्ध होणार आहे.

‘आयआरसीटीसी’ने जाहीर केलेल्या खाद्यपदार्थ दरपत्रकामध्ये सर्वात कमी ते सर्वात जास्त दराच्या पदार्थाचे वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये पाच रुपयांत 150 मिलि चहाचा समावेश आहे. तर सर्वाधिक किंमतीत चिकन बिर्याणीचा समावेश असून त्याची किंमत 89 रुपये आहे. त्याचबरोबर 52 रुपयांत बासमतीची व्हेज बिर्याणी, 72 रुपयांत फिश करी, 61 रुपयात अंडा बिर्याणी, इडली चटणी 15 रुपये, पाव भाजी 36 रुपये तर मसाला डोसाचे दर 18 रुपये ठरविण्यात आले आहेत. रेल्वे विभागातील खानपान व्यवस्थेतील सर्व ठेकेदारांना हे दर सक्तीचे करण्यात आले आहेत.

नव्या आदेशानुसार खाद्यपदार्थांवर 5 टक्केच जीएसटी आकारण्यात यावा, असे स्पष्ट करण्यात आले असून पदार्थांचे दर बंधनकारक करण्यात आले आहेत. तसेच खाद्यपदार्थाचे दरपत्रक संबंधित ठिकाणी लावणे आणि ग्राहकाला खाद्यपदार्थाची पावती देणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे.

म्हणून काढले दरांबाबतचे आदेश
रेल्वे गाड्यांमधील पेंन्ट्री कार, डायनिंग कारच्या माध्यमातून प्रवाशांना देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांवर 18 टक्के जीएसटीची आकारणी केली जात होती. यानंतर यावर चर्चा होऊन जीएसटीचा दर 5 टक्के आकारण्यात यावा, असे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले. मात्र, यानंतर देखील काही ठेकेदारांकडून नियमाला हारताळ फासत 18 टक्के जीएसटी आकारुन खाद्य पदार्थांची विक्री केली जात होती. याबाबत अनेक प्रवाशांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या. त्यामुळे अखेर “आयआरसीटीसी’ने खानपान व्यवस्थेतील ठेकेदारांसाठी दरपत्रकाबाबतचे आदेश काढले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)