रेल्वे पोलीस भरतीत महिलांना 50 टक्‍के आरक्षण: रेल्वे मंत्री 

पाटणा(बिहार): रेल्वे पोलीस भरतीत महिलांना 50 टक्‍के आरक्षण देणार असल्याचे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आज जाहीर केले. पाटणा येथे आर ब्लॉक-दीघा रेल्वे लाईन जमिनीच्या बिहार सरकारला हस्तांतरण समारंभात ते बोलत होते. या प्रसंगी त्यांनी रेल्वे प्रकल्पांची पायाभरंणी आणि शुभारंभ केला.
याच कार्यक्रमात आरपीएफ (रेल्वे पोलीस फोर्स) मध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याची घोषणा करताना पियुष गोयल यांनी सांगितले, की सुमारे 10,000 आरपीएफ जवानांच्या आगामी भरतीत महिलांना 50 टक्के देण्याबरोबरच रेल्वेत 13,000 जागांसाठी भरती करण्यात येणार असून या सर्व जागांसाठी कंप्युटर आधारित परीक्षा होतील आणि कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही. महत्त्वाच्या सर्व रेल्वे स्टेशन्सवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहिती गोयल यांनी दिली
मोदी सरकारने बिहारमध्ये 165 टक्के अतिरिक्त गुंतवणूक केली असल्याचे स्पष्ट करताना सन 2009 ते 20014 या काळात बिहारमध्ये 5.5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. ती आता 15,000 कोटी रुपये झालेली असल्याचे पियुष गोयल यांनी बापू सभागृहातील कार्यक्रमात सांगितले. बिहारच्या विकासाला रेल्वेच्या योजना गती देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)