रेल्वे डब्ब्यात महिलेचा मृतदेह

पिंपरी – मुंबई-नागरकोईल एक्‍सप्रेसच्या डब्ब्यामध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. ही घटना गुरुवारी (दि. 13) सायंकाळी साडेचारच्या सुमारास उघडकीस आली.

मुंबई-नागरकोईल एक्‍सप्रेसमध्ये एका महिलेच्या रक्ताच्या उलट्या झाल्या. ही बाब डब्ब्यातील महिलांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ पुढील रेल्वे स्थानकावर गाडी थांबताच रेल्वे गार्डच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार रेल्वे गार्ड आणि चालक यांनी पिंपरी पोलिसांना ही खबर दिली.

पिंपरी रेल्वे पोलिसांनी रेल्वेच्या महिला डब्यातून संबंधित महिलेला उपचारासाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. या महिलेची अद्याप ओळख पटली नाही. रंग गोरा, चेहरा गोल, उंची चार फूट तीन इंच, अंगाने सडपातळ, पंधरा कुर्ता व पिवळा लेहंगा असे तिचे वर्णन आहे. या वर्णनाची महिला कोणाच्या ओळखीची असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)