रेल्वे उड्डाणपुलावर अपघातात युवतीचा मृत्यू

नगर – नगर-पुणे रोडवर रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात मालट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दीपाली पोपट शिंदे (वय-25 रा. पानोली, ता. पारनेर) ही युवती ठार झाली आहे. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

अपघातातील मयत दीपाली ही नगरमधील कृषी विभागाच्या कार्यालयात कृषी साहाय्यक पदावर कार्यरत होती. कार्यालयाकडे जात असताना हा अपघात झाला. दीपालीच्या दुचाकीला अज्ञात वाहनचालकांनी धडक देऊन तो फरार झाला. या अपघातात दीपाली ही गंभीर जखमी झाली. काही व्यक्तीनी तिला आनंदऋषी हॉस्पिटला उपचारासाठी भरती केले असता, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)