रेल्वे अपघाता एकाचा मृत्यू

पिंपरी – रेल्वेच्या धडकेत इसमाचा मृत्यू झाला आहे. ही घटना कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रविवारी (दि.26) सकाळी साडे सातच्या सुमारास घडली. पिंपरी लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख पटली नसून वय अंदाजे 32 वर्षे आहे. सडपातळ बांधा, उंची 5 फूट पाच इंच, दाढी-मिशी नाही, केस काळे वाढलेले असे वर्णन आहे. काळी पॅन्ट आणि राखाडी स्वेट शर्ट घातला असून त्यांच्यावर ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटी असे लिहले आहे. या वर्णनाची व्यक्ती आढळल्यास पिंपरी रेल्वे पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)