रेल्वेशी संबंधित पर्यावरण आणि स्वच्छता या विषयावर चर्चासत्र

नवी दिल्ली – रेल्वे मंत्रालय किफायतशीर दर, नवीकरणीय ऊर्जेचा वापर तसेच विद्युतीकरणाला मोठे प्रोत्साहन देत असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे. रेल्वे मंत्रालयाने आयोजित केलेल्या चर्चा सत्रादरम्यान ते आज बोलत होते. रेल्वेशी संबंधित पर्यावरण आणि स्वच्छता या विषयांवरच्या या चर्चेमध्ये रेल्वेशी संबंधित नसलेल्या संस्थांनांही चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले होते. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून, तर रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहैन विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. रेल्वे हे प्रवासाचे सर्वात जास्त पर्यावरण स्नेही साधन असल्याचे रेल्वे राज्यमंत्र्यांनी सांगितले.
नाबार्ड अर्थात राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅंक, भारतीय उद्योग महासंघ, निरी, टेरी, यासह 50 संस्थांचे प्रतिनिधी या चर्चेला उपस्थित होते. रेल्वेशी संबंधित पर्यावरण आणि स्वच्छता या विषयावर या प्रतिनिधींनी आपली मौल्यवान मते आणि सूचना मांडल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)