रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडून पदाचा गैरवापर – काँग्रेस

नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वे आणि कोळसा मंत्री पियूष गोयल यांनी आपल्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर करून घेतला असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. एका खासगी कंपनीतील आपला हिस्सा त्याच्या दर्शनी मूल्याच्या हजारपट अधिक किंमतीने ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका कंपनीला विकल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

आपल्या फायद्यासाठी व्यवहारात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करत गोयल यांची पदावरून हकालपट्टी करावी अशी देखील मागणी कॉंग्रेसने केली आहे. तसेच त्यांच्या स्वतंत्र चौकशीची मागणी काँग्रेसनेदेखील केली आहे. दरम्यान, भाजपाने गोयल यांच्या बचावासाठी उडी घेतली असून हा अत्यंत आधारहीन व चुकीचा आरोप असल्याचे म्हटले आहे.

-Ads-

एक संकेतस्थळाच्या माहितीच्या आधारवर काँग्रेसने हा आरोप केला आहे. गोयल यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये आपले आणि आपल्या पत्नीच्या मालकीच्या कंपनीचे सर्व शेअर्स अजय पिरामल यांच्या कंपनीला दर्शनी मूल्याच्या एक हजार पट अधिक किंमतीने विकली. याची माहिती त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला दिली नाही. हा व्यवहार गोयल यांनी मंत्रिपद स्वीकारल्यानंतर चार महिन्यानंतर झाला होता. पिरामल समूह अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातही कार्यरत आहे. गोयल त्यावेळी वीज आणि अपारंपारिक ऊर्जा मंत्री होते. काँग्रेसने गोयल यांच्या कायदेशीर व्यवसायावर चुकीचे आरोप केल्याचे भाजपाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)