रेल्वेत प्रवाशांचे मोबाईल चोरणारी टोळी जेरबंद

जालना – रेल्वेच्या स्लीपर कोचमध्ये झोपलेल्या प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात आले आहे. नांदेडहून औरंगाबादला जाणाऱ्या रेल्वेत मोबाईल चोरणाऱ्या टोळीला जालना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

आशिष बारीय, नागनाथ सुतवणे आणि सागर कवडे अशी आरोपींची नावे आहेत. स्लीपर कोचमधील प्रवासी झोपल्यानंतर पहाटे एक ते चार वाजताच्या दरम्यान हे चोरटे प्रवाशांचे मोबाईल चोरुन पसार होत. दररोज दहा मोबाईल चोरण्याचे चोरांचे टार्गेट होते. गेल्या दीड वर्षांपासून हे तिघेही प्रवाशांच्या खिसे, बॅगेतून मोबाईल चोरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. टोळीमध्ये दोघे जण परप्रांतीय असून एक जण जालन्यातील रहिवाशी आहे.

जालना शहरात काही जण चोरीचे मोबाईल विकत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींचा शोध घेत त्यांच्या मुसक्‍या आवळल्या. त्यांच्याकडून 50 हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)