रेल्वेत चोरी करणारा कर्नाटकातील सराईत अटकेत

लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा, आरपीएफची कारवाई


पुणे रेल्वे स्टेशन येथे दोन गुन्हे उघड


सुमारे 8 लाख 98 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त

 

पुणे- रेल्वेतील महिला प्रवाशांच्या पर्स चोरणाऱ्या सराईतास कर्नाटक, गुलबर्गा येथून लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि “आरपीएफ’च्या पथकांनी अटक केली. पुणे स्टेशन येथे त्याने दोन गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. त्याच्याकडून 8 लाख 98 हजार 200 रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. अल्लाबक्‍श महम्मद इस्माईल (वय 19, रा. गुलबर्गा, कर्नाटक), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
पहिल्या गुन्ह्यात सिद्धार्थ भंडारी (रा. बेळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. भंडारी कुटुंबीयासह दि. 7 जुलै 2018 रोजी अजमेर – म्हैसूर एक्‍स्प्रेसमधून प्रवास करीत होते. ही गाडी पुणे रेल्वे स्टेशन स्थानकावर आल्यानंतर भंडारी यांच्या पत्नीची दागिने, मोबाइल आणि रोख रक्‍कम मिळून 7 लाख 58 हजारांचा ऐवज ठेवलेली पर्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी पुणे लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्यापाठोपाठ दि. 2 सप्टेंबर रोजी रेखा भंडारी (रा. इचलकरंजी) या जोधपूर बेंगलोर एक्‍स्प्रेसने प्रवास करीत असताना पुणे स्टेशनवर पहाटेच्या सुमारास त्यांची दागिने ठेवलेली पर्स चोरी झाली होती. रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि पुणे लोहमार्ग पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या गुन्ह्याचा तपास करीत होते. दरम्यान, रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही तपासून पाहिल्या असता वरील दोन्ही गुन्हे एकाच आरोपीने केल्याचे दिसून आले. चित्रफितीवरून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू केले. दरम्यान हे गुन्हे गुलबर्गा येथील सराईत गुन्हेगार अल्लाबक्‍शने केल्याची माहिती लोहमार्ग स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांना मिळाली. त्यानुसार पथकांनी गुलबर्गा येथे जावून अल्लाबक्‍श याच्या मुसक्‍या आवळल्या. घराची झडती घेतली असता, दोन्ही गुन्ह्यात चोरलेला 8 लाख 98 हजारांचा ऐवज जप्त केला.
पुणे लोहमार्ग अधीक्षक दीपक साकोरे, “आरपीएफ’चे सहायक आयुक्‍त बी. के. मकरारीया यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल दबडे, कर्मचारी धनंजय दुगाने, सुनील कदम, आनंद कांबळे, सुधाकर जगताप, दिनेश बोरनारे, विक्रम मधे, स्वप्निल कुंजीर, आरपीएफचे सहायक निरीक्षक सुनील चाटे, उपनिरीक्षक विजयपाल सिंग, एच. आर. खोकर, विशाल माने, युवराज गायकवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)