रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू

तळेगाव दाभाडे – कोणत्यातरी धावत्या रेल्वे गाडीतून पडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार (दि. 26) सकाळी साडेसहाच्या सुमारास पुणे-लोणावळा लोहमार्गावर तळेगाव दाभाडे स्टेशन (ता. मावळ) येथे उघडकीस आली.

लोहमार्ग पोलीस हवालदार एल. एम. पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-लोणावळा लोहमार्गावर तळेगाव दाभाडे स्टेशन (ता. मावळ) येथे कोणत्यातरी धावत्या रेल्वे गाडीतून पडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 40 ते 45 वर्ष असून उंची 5 फुट 5 इंच आहे. बांधा मध्यम, चेहरा उभट, नाक सरळ, डोकीचे केस काळे पांढरे, अंगात आकाशी रंगाचा फुल बाह्याचा शर्ट व नेसणीस आकाशी रंगाची हॉफ पॅन्ट असे या व्यक्तीचे वर्णन आहे. या वर्णनाची व्यक्ती कोणाच्या ओळखीची असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)