रेल्वेतून पडून इसमाचा मृत्यू

पिंपरी – पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ एका 50 वर्षीय इसमाचा चालत्या गाडीतून पडून मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 8) सकाळी सहाच्या सुमारास घडली.

याप्रकरणी नागरिकांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याची अंगकाठी मजबुत, रंग गोरा, उंची 5 फूट 5 इंच, उजव्या हातावर हरीष असे इंग्रजीत गोंदलेले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या व्यक्तीच्या डोकीचे केस थोड पांढरे, मिशी वाढलेली, अंगावर जांभळ्या रंगाचा टी-शर्ट व निळ्या रंगाची पांढऱ्या पट्ट्या असलेली ट्रॅक पॅन्ट असे वर्णन असून या वर्णनाच्या व्यक्तीबाबत अधिक माहिती असल्यास पिंपरी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)