रेल्वेतील 1 लाख नोकऱ्यांसाठी 2 कोटींपेक्षा अधिक अर्ज

नवी दिल्ली – भारतीय रेल्वेतील सुमारे 1 लाख नोकऱ्यांसाठी 2 कोटींपेक्षा अधिक अर्ज आल्याची माहिती रेल्वे मंत्रालयच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. अर्ज पाठवण्याची मुदत शनिवारपर्यंत असल्याने अर्जांच्या संख्येत बरीच वाढ होण्याची शक्‍यता आहे.

रेल्वे पोलीस, इंजीन ड्रायवर आणि टेक्‍निशियन्सच्या जागांसाठी ऑनलाईन टेस्ट 15 भाषांतून घेण्यात येणार आहे. मध्यम आणि खालच्या पातळीतील नोकऱ्यांसाठी आलेला प्रचंड प्रतिसाद पाहून रेल्वे अधिकारीही चकित झाले आहेत. अर्ज केलेल्या उमेदवारांमध्ये अनेक उमेदवार आवश्‍यकतेक्षाही अधिक शैक्षणिक पात्रता असल्याचे सांगण्यात आले आहे. अनेक उमेदवार तर पी. एचडी आहेत, या नोकऱ्यांसाठी 50 लाख अर्जदारांचे अर्ज ऑनलाईन आलेले आहेत.

जगातील एक सर्वात मोठे रेल्वे जाळे असणारी, सुमारे दहा लाख कर्मचारी असलेली भारतीय रेल्वे देशातील एक मोठी नोकरीदाता कंपनी आहे. भारतीय रेल्वेतून दररोज सुमारे 2.3 कोटी लोक प्रवास करतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)