रेल्वेतील खाद्यपदार्थांवर पाच टक्के जीएसटी

नवी दिल्ली : रेल्वेतील खाद्यपदार्थांवर १८ टक्के जीएसटी आकारण्यात येत होता. परंतु आता रेल्वे बोर्डाच्या नव्या निर्णयानुसार रेल्वेत मिळणाऱ्या कोणत्याही खाद्यपदार्थांवर केवळ पाच टक्केच जीएसटी आकारणीचे बंधन घातले आहे. त्याचप्रमाणे खाद्यपदार्थाची पावती देणेही सक्तीचे करण्यात आले आहे.

रेल्वेतील खाद्यपदार्थांवर १८ टक्के जीएसटी असल्याचे रेल्वे बोर्डाकडूनही सांगण्यात येत होते. मात्र, अर्थ मंत्रालयाकडून ५ टक्के जीएसटी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अर्थ मंत्रालयाच्या सूचनेनंतरही काही ठेकेदार १८ टक्के जीएसटी आकारून पूर्वीच्याच दरामध्ये खाद्यपदार्थाची विक्री करीत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी होत्या. त्यानंतर आयआरसीटीसीने याबाबत स्पष्ट आदेश काढले आहेत. या आदेशानुसार रेल्वेतील खाद्यपदार्थावर ५ टक्क्यांहून अधिक जीएसटी आकारता येणार नाही.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)