रेल्वेच्या हद्दीत होर्डिंग असेल, तर परवानगी कशाला?

दुर्घटनेप्रकरणी रेल्वे प्रशासनाने हात झटकले : कोर्टाच्या निर्णयाचा आधार 

पुणे – शाहीर अमर शेख चौकातील होर्डिंग कायदेशीरच आहेत. संबंधित एजन्सीला त्याचे स्ट्रॅक्‍चरल ऑडिटसाठी सांगितले होते. पण, त्यांनी ऑडिट न केल्याने रेल्वेने स्वत:हून पाहणी करत ते काढण्याचा निर्णय घेतला. रेल्वे हद्दीतच ते पाडण्यात येणार होते. मात्र, दुर्देवाने ते रस्त्यावर पडल्याने दुर्घटना घडली. यापूर्वी याच पद्धतीने चार होर्डिंग पाडण्यात आले. रेल्वेच्या हद्दीत होर्डिंग असेल, तर त्यासाठी महापालिकेची परवनागी लागत नाही, असे सांगत रेल्वे अधिकाऱ्यांनी दुर्घटनेप्रकरणी हात झटकले.

-Ads-

शुक्रवारी जुना बाजार येथील रेल्वेच्या जागेतील लोखंडी होर्डिंगचा सांगाडा कोसळून चौघांचा मृत्यू झाला. रेल्वेकडूनच ठेकेदारामार्फत होर्डिंग काढण्याचे काम सुरू होते. घडलेल्या घटनेमध्ये रेल्वेची चूक नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात खुलासा करण्यासाठी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी, विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर व वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

उदासी म्हणाले, “रेल्वे हद्दीत अनेक होर्डिंग असून मागील वर्षी उच्च न्यायालयाने होर्डिंगबाबत रेल्वेच्या बाजूने निकाल दिला आहे. रेल्वेच्या हद्दीत होर्डिंगसाठी पालिकेची परवानगी आवश्‍यक नसल्याचे निकालात म्हटले आहे. त्यामुळे या होर्डिंगसह रेल्वेच्या हद्दीतील सर्व होर्डिंग कायदेशीरच आहेत. संबंधित ठेकेदाराने होर्डिंगचे स्टॅक्‍चरल ऑडिट सादर न केल्याने रेल्वने स्वतः ते पाडण्याचा निर्णय घेतला होता. 19 जानेवारी 2018 पासून होर्डिंगवर एकही जाहिरात लावली नाही. होर्डिंगबाबत महापालिकने जानेवारी-2018 मध्ये रेल्वेला पत्र दिले होते. त्याला फेब्रुवारीत उत्तर देत होर्डिंग अधिकृत नसल्याचे सांगण्यात आले होते. स्ट्रक्‍चरल ऑडिट सादर न केलेले एकूण 6 होर्डिंग काढण्याचे रेल्वे प्रशासनाने सुरू केले होते, असा दावा यावेळी करण्यात आला.

होर्डिंग हटविताना हलगर्जीपणा : देऊस्कर
जुना बाजार येथे जे होर्डिंग उभारण्यात आले होते. ते नियमानुसार बसविण्यात आले होते. ते अवैध नसल्याचा खुलासा रेल्वेच्या पुणे परिमंडळ विभागाचे प्रमुख मिलिंद देऊस्कर यांनी केला आहे. होर्डिंग हटविताना हलगर्जीपणा झाल्यामुळेच ही घटना घडली आहे.त्याबाबतच उच्चस्तरीय समिती निष्पक्ष चौकशी करत आहे. त्याचबरोबर घोरपडी आणि जुना बाजार येथील होर्डिग काढण्याच्या जबाबदारी ही वेगवेगळ्या ठेकदारांकडे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)