रेल्वेच्या वेबसाईटवरून करता येणार ओला कॅब बुकिंग

नवी दिल्ली : देशभरात जाळे विस्तारण्यासोबत प्रवाशांना सुविधा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय रेल्वेने आणखी एक सुविधा सुरू केली आहे. रेल्वेच्या आयआरसीटीसी या वेबसाईट आणि अॅपद्वारे आता ओला कॅब बुक करता येणार आहे. याबाबत रेल्वे आणि ओला यांच्यात करार झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, पहिल्या ६ महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर ही सेवा देण्यात येणार आहे.

ओला कॅबची ही सुविधा रेल्वे प्रवाशांना मिळणार असून ओला मायक्रो, ओला मिनी, ओला ऑटो आणि ओला शेअर इत्यादी सुविधांची माहिती त्याच्या किमान भाड्यासह आयआरसीटीसीच्या वेबसाईट आणि अॅपवर मिळणार आहे. मात्र यातून ग्राहकांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. रेल्वेचे प्रवासी ७ दिवस आधी आपली टॅक्सी बुक करू शकणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)