रेल्वेच्या राम निवासला “भारत श्री’ किताब

       रेल्वेला सांधिक विजेतेपद, तर महाराष्ट्राला उपविजेतेपद

पुणे- मध्यरात्रीचे दोन वाजले होते. हजारोंच्या संख्येने गर्दी करणाऱ्या क्रीडाप्रेमींना एकच प्रश्न सतावत होता, सुनीत जाधव की राम निवास? याचे उत्तर जजेसनाही सापडत नव्हते. दोन-दोन वेळा तुलना केल्यानंतरही प्रश्न कायम होता. अशा श्वास रोखून धरणाऱ्या लढतीत सुनीतचे भारत श्रीच्या हॅटट्रिकचे स्वप्न उद्‌ध्वस्त करीत राम निवासने अकराव्या भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत “चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’चा बहुमान पटकावला. सुनीतला उपविजेतेपद तर दिल्लीच्या नरेंदर यादवला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दहापैकी पाच गटात सोनेरी कामगिरी करणारा रेल्वे सांघिक विजेतेपदाचा मानकरी ठरला. महाराष्ट्राला पुन्हा एकदा उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले.

बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात भारतीय शरीरसौष्ठवाचा कुंभमेळा थरारक, उत्कंठावर्धक आणि ऐतिहासिक झाला. 584 खेळाडूंच्या उपस्थितीने विक्रम रचणाऱ्या अकराव्या भारत श्रीचा समारोप हृदयाचे ठोके चुकवणारा ठरला. सुनीत कडवे आव्हान परतवून हॅटट्रिक करणार या आशेने हजारो शरीरसौष्ठवप्रेमी तहानभूक विसरून घामाघूम झाले होते. चॅम्पियन ऑफ चॅम्पियनच्या गटात सुनीतसमोर राम निवास आणि अनुज कुमारचे कडवे आव्हान होते. मात्र पहिल्या कंपेरिजनमध्ये अनुज मागे पडला आणि भारत श्रीचा फैसला सुनीत आणि राम निवासमध्येच लागणार हे स्पष्ट झाले.

दोघेही एकास एक असल्यामुळे जजेसनी कसून तुलना केली. यात दोघांचेही समान गुण झाले. त्यामुळे निकाल लावण्यासाठी भारतीय शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनी माजी विश्व श्री प्रेमचंद डेगरा, व्यायाममहर्षी मधुकर तळवलकर यांना जजेसच्या जागी बसविले आणि या तज्ज्ञांच्या तिसऱ्या चाचणीत राम निवासने सुनीतवर निसटता विजय नोंदवला. भारत श्री किताब राम निवासने जिंकला असला तरी पुणेकरांची मने सुनीतनेच जिंकली. पुरस्कार वितरण सोहळा पद्मश्री प्रेमचंद डेगरा, व्यायाममहर्षी मधुकर तळवलकर, खुद्द चेतन पाठारे, ऍड. विक्रम रोठे, मदन कडू, राजेश सावंत आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ बनलेल्या अजय खानविलकर आणि प्रशांत आपटे यांच्या उपस्थितीत पार पडला. क्रीडाप्रेमी अनिकेत तटकरे यांनी यंदापासूनच भारत श्री विजेत्या खेळाडूला रोख 51 हजार रुपये रोख देणार असल्याची घोषणा करून खेळाडूंचा आनंद द्विगुणित केला.

गटात एक लाख जिंकणाऱ्या रामनिवासला साडेसात लाख रुपयांचे रोख इनामही मिळाले. सोबत तटकरेंनी जाहीर केलेल्या 51 हजार रुपयांसह त्याने नऊ लाख रुपयांची कमाई केली. शरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच गटविजेतेपदाला एक लाख आणि विजेत्याला साडेसात लाख रुपयांनी गौरविण्यात आले. तब्बल नऊ तास नॉनस्टॉप रंगलेल्या या सोहळ्यात सूत्रसंचालक राणाप्रताप तिवारी यांनी आपल्या जोशिल्या आणि स्फूर्तीदायक आवाजातून बालेवाडीचे स्टेडियम अक्षरशा हलवून सोडले.

सविस्तर निकाल-
भारत श्री किताब विजेता ः राम निवास (रेल्वे),
द्वितीय क्रमांक – सुनीत जाधव (महाराष्ट्र),
तृतीय क्रमांक – नरेंदर यादव ( दिल्ली),
बेस्ट पोझर – एन. सर्बो सिंग (रेल्वे),
सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू – अनुज कुमार (उ. प्र.),
सांघिक विजेतेपद- रेल्वे (87 गुण),
सांघिक उपविजेतेपद- महाराष्ट्र (60 गुण),
पुरुष शरीरसौष्ठव –
55 किलो- 1. जे.जे. चकवर्ती (रेल्वे), 2. सोनू (दिल्ली), 3. पुंदनकुमार गोपे (रेल्वे), 4. एल. नेता सिंग (मणिपूर),5. व्ही. आरिफ (केरळ),
60 किलो- 1. नितीन म्हात्रे (महा. अ), 2. के. हरीबाबू (रेल्वे), 3. प्रतिक पांचाळ (महा. ब), 4. अंकूर (दिल्ली), 5. दीपू दत्ता (आसाम),
65 किलो- 1. एस. भास्करन (रेल्वे), 2. अनिल गोचीकर (ओडिशा), 3. मित्तलकुमार सिंग (दिल्ली), 4. टी. कृष्णा (म. प्र.),5. रियाज टी.के. (केरळ),
70 किलो- 1. अनास हुसेन (रेल्वे), 2. हिरालाल (पंजाब पोलीस), 3. राजू खान (दिल्ली), 4. धर्मेंदर सिंग (दिल्ली), 5. हरिश्‍चंद्र इंगावले (पुद्दुचेरी),
75 किलो- 1. व्ही. जयप्रकाश (रेल्वे), 2. मोहम्मद सद्दाम (उ. प्र.), 3. सुशील मुरकर (महा. ब), 4. प्रवीण कंबारकर (कर्नाटक), 5. राजीव साहू (मध्य प्रदेश),
80 किलो- 1. सागर कातुर्डे (महा.), 2. एन. सर्बो सिंग (रेल्वे), 3. बी. महेश्वरन (तमिळनाडू), 4. रविंदर मलिक (गुजरात), 5. राज चौधरी (उत्तर प्रदेश),
85 किलो- 1. नरेंदर यादव (दिल्ली), 2. प्रीतम चौगुले (रेल्वे), 3. ए. बॉबी सिंग (रेल्वे), 4. आय. देवा सिंग (म. प्र.), 5. मिथुन साहा (प.बंगाल),
90 किलो- 1. सुनीत जाधव (महा.), 2. महेंद्र चव्हाण ( महा.), 3. रिजू पॉल जोस (गुजरात), 4. सागर जाधव (रेल्वे), 5. रोहित शेट्टी (महा.),
90-100 किलो- 1. राम निवास (रेल्वे), 2. महेंद्र पगडे (महा.), 3. एस. सेंथिल कुमारन (तमिळनाडू), 4. अमित छेत्री (उत्तराखंड), 5. समीर खान (म. प्र.),
100 किलोवरील- 1. अनुज कुमार (उ. प्र.), 2. जावेद अली खान (रेल्वे), 3, अतुल आंब्रे (महाराष्ट्र), 4. अक्षय मोगरकर (महाराष्ट्र), 5) नितीन बाबू (गुजरात),
महिला शरीरसौष्ठव – 1. कांची आडवाणी (महा. अ), 2. ममता देवी यमनम (दिल्ली), 3. गीता सैनी (हरयाणा), 4. जमुना देवी (मणिपूर), सरिता देवी (मणिपूर), महिला स्पोर्टस्‌ मॉडेल – 1. संजू (उ. प्र.), 2. सोनिया मित्रा (प. बंगाल), 3. अंकिता सिंग (कर्नाटक), 4. स्टेला गोडे (महा. अ), 5. मंजिरी भावसार (महा. अ), फिजिक स्पोर्टस्‌ ( पुरुष) ः 1. चेतन सैनी ( चंदीगड), 2. किरण साठे (महा.), 3. रोहन पाटणकर ( महा.), 4. वेस्ली मेनन (प. बंगाल), 5. अनिल सती (उ. प्र.).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)