रेल्वेच्या धडक मोहिमेत पावणे सहा कोटी रुपयांची बनावट तिकिटे जप्त 

नवी दिल्ली: रेल्वे पोलीसांनी चालवलेल्या धडक मोहिमेत सुमारे पावणेसहा कोटी रुपयांची बनावट तिकिटे जप्त केल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ऐन दिवाळी सणाच्या मोसमात रेल्वेच्या सर्वच मार्गांवर प्रत्येक ट्रेनला तुफान गर्दी असते. या काळात होणारा तिकिटांचा काळा बाजार लक्षात घेऊन आरपीएफ (रेल्वे पोलीस फोर्स) ने तिकिट दलालांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत 7 ऑक़्टोबरपासून ऑक्‍टोबर अखेरपर्यंत 1268 ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

या कारवायांमध्ये सुमारे पावणे सहा कोटी रुपयांची बनावट तिकिटे आरपीएफने जप्त केली असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. बनावट सॉफ्टवेयर करून तिकिट विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबईत पर्दाफाश करण्यात आलेला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या काळात बनावट तिकिटे विकणाऱ्या 166 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या शुक्रवारीच आरपीएफने 110 ठिकाणी छापे घातल्याचे दिल्ली रेल्वे व्यवस्थापनाने सांगितले आहे. खास करून दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर होणाऱ्या रेल्वे तिकिटांच्या काळाबाजरावर अंकुश ठेवण्यासाठी रेल्वेने ही कारवाई सुरू केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)