कामशेत – मध्य रेल्वेच्या डाउन ट्रकवर मंगळवारी (दि. 4) रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात रेल्वेची धडक बसल्यामुळे एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत शहरातील हद्दीमध्ये रेल्वेच्या डाउन ट्रॅकवर किलोमीटर नं. 144/34 ते 144/50 दरम्यान गाडीने धडक दिल्यामुळे एका अज्ञात तरुणाचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती अंगाने सडपातळ, सावल्या रंगाचा असून, त्याने अंगात निळ्या रंगाचे बनियन, काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट, लाल रंगाचे सॅंडल घातलेले असून, त्याने वय अंदाजे 32 ते 35 असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. या प्रकरणी हवालदार एस. बी. तोडमल तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)